Maharashtra Corona Update : राज्यात आज 40,925 नवे कोरोना रुग्ण, मुंबईत 20, 971 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात आज (शुक्रवारी) 40 हजार 925 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी मुंबईत 20 हजार 971 रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 68 लाख 34 हजार 222 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 47 हजार 410 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 14 हजार 256 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 95.80 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 1 लाख 41 हजार 492 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 91 हजार 731 ॲक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहेत. आज दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.07 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 7 लाख 42 हजार 684 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,664 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.