Maharashtra Corona Update : राज्यात आज 44,388 नवे कोरोना रुग्ण, 207 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) 44 हजार 388 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 19 हजार 474 रुग्ण मुंबईमधील आहेत तर, पुण्यात 4 हजार 029 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 207 ओमायक्रॉन बाधितांची राज्यात भर पडली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 69 लाख 20 हजार 044 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 72 हजार 432 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 15 हजार 351 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 94.98 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या 2 लाख 02 हजार 259 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 41 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे.

राज्यात आजवर 7 कोटी 05 लाख 45 हजार 105 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 10 लाख 76 हजार 996 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2,614 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात एक हजाराहून अधिक ओमायक्रॉन बाधित –

आतापर्यंत 1,216 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक 606 रुग्ण मुंबईतील, 223 पुणे मनपा तर 68 पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 1,009 रुग्णांपैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.