Maharashtra Corona Update : दिलासादायक! राज्यात आज रविवारपेक्षा दहा हजार रुग्ण कमी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) 33 हजार 470 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारपेक्षा आज दहा हजार रुग्ण कमी नोंदवले आहेत. रविवारी राज्यात 44 हजार 388 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 69 लाख 53 हजार 514 एवढी झाली आहे. त्यापैकी 66 लाख 02 हजार 103 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 29 हजार 671 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 94.98 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या 2 लाख 06 हजार 046 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 41 हजार 647 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे.

राज्यात आजवर 7 कोटी 07 लाख 18 हजार 911 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 10 लाख 76 हजार 996 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2,614 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.