Maharashtra Corona Update : राज्यात आज 46,723 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 86 ओमायक्रॉनबाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) कोरोनाच्या 46,723 नव्या रुग्णांची भर झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28,041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 70 लाख 34 हजार 661 एवढी झाली आहे. त्यापैकी 66 लाख 49 हजार 111 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 94.52 टक्के एवढा झाला आहे.

सध्या राज्यात 2 लाख 40 हजार 122 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 1 लाख 41 हजार 701 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे.

राज्यात आजवर 7 कोटी 11 लाख 42 हजार 569 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 15 लाख 29 हजार 452 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6,951 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.