Maharashtra Corona Update : राज्यात आज 43,211 नवे कोरोना रुग्ण, 238 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) कोरोनाच्या 43,211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33,356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 71 लाख 24 हजार 278 एवढी झाली आहे. त्यापैकी 67 लाख 17 हजार 125 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 94.28 टक्के एवढा झाला आहे.

सध्या राज्यात 2 लाख 61 हजार 658 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 1 लाख 41 हजार 701 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 15 लाख 64 हजार 070 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 19 लाख 10 हजार 361 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 9,286 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज 238 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 238 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 197 पुणे महानगरपालिका हद्दीत, 32 पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई मध्ये प्रत्येकी 3, मुंबईत 2 आणि अकोल्यात 1 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 605 एवढी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.