Maharashtra Corona Update : आज 31,111 नवे कोरोना रुग्ण, कालपेक्षा 10 हजार रुग्ण कमी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) कोरोनाच्या 31,111 नव्या रुग्णांची भर झाली पडली आहे. कालपेक्षा (रविवार) आज 10 हजार कमी रुग्ण आहेत. आज 29,092 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 94.30 टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 72 लाख 42 हजार 921 एवढी झाली आहे. त्यापैकी 68 लाख 29 हजार 992 जण बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 2 लाख 67 हजार 334 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 24 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 41 हजार 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.95 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 21 लाख 24 हजार 824 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 22 लाख 64 हजार 217 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2,994 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज 122 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 122 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 40 पुणे महानगरपालिका हद्दीत आणि 29 मीरा भाईंदर हद्दीतील आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 860 एवढी झाली आहे. त्यापैकी 959 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.