Maharashtra Corona Update : आज 251 कोरोना रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) दिवसभरात 251 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, शून्य मृत्यू झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 2,524 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 71 हजार 202 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 20 हजार 922 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज 448 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के आहे.

 

राज्यात आजवर 1 लाख 43 हजार 752 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 86 लाख 45 हजार 510 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.