Maharashtra Corona Update : आज शंभरहून कमी कोरोना रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. आज (सोमवारी) दिवसभरात 99 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. शनिवार नंतर आज दुसऱ्यांदा शंभरहून दैनंदिन वाढ नोंदवली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 72 हजार 512 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 23 हजार 468 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात 180 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 98.11 टक्के आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 1,273 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 1 लाख 43 हजार 767 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 89 लाख 86 हजार 970 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.