Maharashtra Corona Update : कोरोना संसर्ग मंदावतोय, राज्यात 25,728 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली असून, आज (बुधवारी) 1 हजार 825 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 879 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 25 हजार 728 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 65 लाख 96 हजार 945 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 27 हजार 426 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.45 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 21 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 886 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 6 कोटी 13 लाख 70 हजार 390 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 1 हजार 4 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2 लाख 05 हजार 205 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.