Maharashtra Corona Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांकडे कडे देणार विशेष लक्ष; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात….

एमपीसी न्यूज – साधारण दोन वर्षांच्या कालखंडानंतर कोरोना (Maharashtra Corona) संकट ओसरले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा या संकटाने डोके वर काढले आहे, त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा खबरदारीची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांत कोरोना आकडेवारी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, तिथे विशेष लक्ष देणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाची काल महत्त्वपूर्ण (दि. 07 जून) बैठक पार पडली, त्यावर बोलताना मंत्री टोपे यांनी याबाबत माहिती दिली. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आमचे लक्ष लसीकरणावर आहे. विशेषतः बूस्टर डोसकडे दुर्लक्ष करू नये, दरम्यान बुस्टर हा खबरदारीचा डोस असल्याने राज्य सरकार ते मोफत देणार नाही. राज्यातील निर्बंधांविषयी बोलताना टोपे पुढे म्हणाले, सध्या राज्यात कोणतेच निर्बंध नाहीत, मात्र नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिने मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Todays Horoscope 07 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर 9 जिल्ह्यात कोरोना प्रकरणात (Maharashtra Corona) वाढ झाली आहे, यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णवाढ झालेल्या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणार असल्याचे मंत्री टोपे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यभरात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत 130.84% वाढ झाली असून पुणे, मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत रुग्णांची पुन्हा लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पाच जिल्ह्यांकडे राज्यसरकारचे सातत्याने लक्ष असून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.