Maharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट 97.48 टक्के, मृत्यू दर 2.12 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) कालपेक्षा 312 अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 1 हजार 201 नवे रुग्ण वाढले असून, काल 889 कोरोना रुग्णांची वाढ झाली होती. आज 1 हजार 370 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.48 टक्के झाला असून, मृत्यू दर 2.12 टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 05 हजार 051 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 38 हजार 395 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 22 हजार 981 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 32 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 40 हजार 060 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 20 लाख 80 हजार 203 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 961 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 76 हजार 191 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.