Maharashtra Corona News : राज्यात वाढले एकाच दिवसात कोरोनाचे दुप्पट रुग्ण; बुधवारी २७०१ रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Maharashtra Corona News) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसाला ८०० ते ९०० सापडणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत.

 

गेल्या दोन दिवसांपासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे.बुधवारी राज्यात दोन हजार ७०१ रुग्ण सापडले आहेत.तर मुंबईत १७६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

 

 

 

Pimpri Corona Update : शहरात आज 35 नवीन रुग्णांची नोंद, 9 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

राज्यात आज २७०१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १३२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज १७६५ रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली.

 

राज्यात (Maharashtra Corona News)  आज एकूण १३२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण ७७ लाख ४१ हजार १४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९८.०२ टक्के आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर १.८७ टक्के इतका झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८ लाख ९८ हजार ८१५ इतकी झाली आहे.

 

राज्यात सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढत आहे. राज्यात आज एकूण ९८०६ सक्रिय रुंग्ण आढळले.त्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे सात हजार इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल ठाण्यात १४८२ इतके सक्रिय रुग्ण आढळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.