Mumbai : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 196 – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 196 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कालपर्यंत 186 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यात आज (रविवारी) आणखी दहा नव्या रुग्णांची भर पडली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची विभागनिहाय आकडेवारी देखील टोपे यांनी दिली. मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 01, जळगाव 01, बुलढाणा 01 असे हे रुग्ण आढळून आल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात एकूण सात कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून त्यातील सहाजण मुंबईतील तर एकजण बुलढाणा येथे आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यात 34 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे एकूण 34 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरानाची 155 सक्रिय प्रकरणे उरली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.