Maharashtra Corona Update : राज्यात दीड कोटी चाचण्या पूर्ण, आज 2,216 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आत्तापर्यंत दीड कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचणीच्या तुलनेत रुग्ण सकारात्मकतेचा दर 13.63 टक्के एवढा आहे. आज दिवसभरात राज्यात 2 हजार 216 कोरोना रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 34 हजार 720 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज झालेल्या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 46 हजार 287 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 58 हजार 971 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 3 हजार 423 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज 15 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 325 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.51 टक्के एवढा आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.73 टक्के एवढा झाला आहे.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 50 लाख 10 हजार 037 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 20 लाख 46 हजार 287 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 67 हजार 764 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 976 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.