-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,442 नवे रुग्ण, 7,504 जणांना डिस्चार्ज 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्यात रविवारी (दि.13) 10 हजार 442 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 504 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजवर महाराष्ट्रातील 56 लाख 39 हजार 271 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 95.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 08 हजार 992 एवढी झाली आहे. आजघडीला राज्यात 1 लाख 55 हजार 588 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

आज महाराष्ट्रात 483 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 11 हजार 104 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे.

 

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 80 लाख 46 हजार 590 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 62 हजार 134 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 160 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn