Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 11,119 नवे रुग्ण; 9,365 जणांना डिस्चार्ज

राज्यात आजवर 4 लाख 37 हजार 870 जण कोरोनामुक्त झाले आहेत. : 11,119 new patients in the state during the day; 9,365 people discharged

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 11 हजार 119 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जवळपास 422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  दिवसभरात 9 हजार 365 जण कोरोनामुक्त झाले असून राज्यात आजवर 4 लाख 37 हजार 870 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 15 हजार 477 एवढी झाली आहे.

त्यापैकी सध्या 1 लाख 56 हजार 608 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर राज्यातील 4 लाख 37 हजार 870 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज सर्वाधिक 422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांची संख्या 20 हजार 687 इतकी झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून राज्याचा रिकव्हरी रेट 70 टक्के एवढा झाला आहे तर, राज्यातील मृत्यूची टक्केवारी 3.36 इतकी आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32 लाख 64 हजार 384 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 6 लाख 15 हजार 477 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 11 लाख 35 हजार 749 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 38 हजार 175 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.