Maharashtra Corona Update: 1165 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 20 हजारांचा टप्पा!

Maharashtra Corona Update: 1165 new patients, number of corona patients crosses 20,000 mark!

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 228 झाली आहे. आज 1,165 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3,800 रुग्ण बरे झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार 804 नमुन्यांपैकी 2 लाख 06 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 20 हजार 228 जण पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 290 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 48 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 779 झाली आहे. मालेगाव शहरातील 8 मृत्यू हे 25 एप्रिल ते 8 मे 2020 या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 27, पुण्यातील 9, मालेगाव शहरात 8, पुणे जिल्ह्यात 1, अकोला शहरात 1, नांदेड शहरात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 21 पुरुष तर 27 महिला आहेत. आज झालेल्या 48 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 27 रुग्ण आहेत तर 18 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत 9 जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांमध्ये (72 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 12,864(489)

ठाणे: 110 (2)

ठाणे मनपा: 800 (८)

नवी मुंबई मनपा: 789 (4)

कल्याण डोंबिवली मनपा: 316 (3)

उल्हासनगर मनपा: 20

भिवंडी निजामपूर मनपा: 21 (2)

मीरा भाईंदर मनपा: 201 (2)

पालघर: 32 (2)

वसई विरार मनपा: 216 (9)

रायगड: 89 (1)

पनवेल मनपा: 137 (2)

ठाणे मंडळ एकूण: 15,595 (524)

नाशिक: 50

नाशिक मनपा: 73

मालेगाव मनपा:  472 (20)

अहमदनगर: 51 (2)

अहमदनगर मनपा: 09

धुळे: 8 (2)

धुळे मनपा: 42 (1)

जळगाव: 111 (12)

जळगाव मनपा: 22 (2)

नंदूरबार: 19 (1)

नाशिक मंडळ एकूण: 857 (40)

पुणे: 118 (5)

पुणे मनपा: 1975 (141)

पिंपरी चिंचवड मनपा: 132 (3)

सोलापूर: 6

सोलापूर मनपा: 184 (10)

सातारा: 98 (2)

पुणे मंडळ एकूण: 2513 (161)

कोल्हापूर: 13 (1)

कोल्हापूर मनपा: 6

सांगली: 32

सांगली मिरज कुपवाड मनपा: 3 (1)

सिंधुदुर्ग: 5

रत्नागिरी: 18 (1)

कोल्हापूर मंडळ एकूण: 77 (3)

औरंगाबाद: 5

औरंगाबाद मनपा: 437 (12)

जालना: 12

हिंगोली: 58

परभणी: 1 (1)

परभणी मनपा: 1

औरंगाबाद मंडळ एकूण: 514 (13)

लातूर: 25 (1)

लातूर मनपा: 0

उस्मानाबाद: 3

बीड: 1

नांदेड: 3

नांदेड मनपा: 30 (3)

लातूर मंडळ एकूण: 62 (4)

अकोला: 9 (1)

अकोला मनपा: 134 (10)

अमरावती: 4 (1)

अमरावती मनपा: 78 (11)

यवतमाळ: 95

बुलढाणा: 24 (1)

वाशिम: 1

अकोला मंडळ एकूण: 345 (24)

नागपूर: 2

नागपूर मनपा: 222 (2)

वर्धा: 0

भंडारा: 1

गोंदिया: 1

चंद्रपूर: 1

चंद्रपूर मनपा: 3

गडचिरोली: 0

नागपूर मंडळ एकूण: 230 (2)

इतर राज्ये: 35 (8)

एकूण:  20 हजार 228 (779)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1243 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 388 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 55 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.