Maharashtra Corona Update : राज्यात 1,21,859 ऍक्टिव्ह रुग्ण, आज 10,066 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज (बुधवारी) 10 हजार 066 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच, 11 हजार 032 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 21 हजार 859 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 लाख 97 हजार 587 एवढी झाली आहे. त्यापैकी 57 लाख 53 हजार 290 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.93 टक्के एवढं झाले आहे. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

राज्यात आज 163 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 19 हजार 303 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 01 लाख 28 हजार 355 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 92 हजार 108 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 223 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.