Maharashtra Corona Update : दिवसभरात 13,348 जण कोरोनामुक्त तर 12,248 नवे रुग्ण 

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.25 टक्के, दिवसभरात 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 13 हजार 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 12 हजार 248 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 15 हजार 332 एवढी झाली आहे. 

राज्यातील एकूण 5 लाख 15 हजार 332 रुग्णांपैकी आजवर 3 लाख 51 हजार 710 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 45 हजार 558 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात आज 390 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 13,348 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 68.25 टक्के  एवढे आहे. राज्यात आज 390 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे आज देखील राज्यभरात सर्वाधिक 68 हजार 70 चाचण्या करण्यात आल्या आहेत,  अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

मुंबईत आज 1066 नवे कोरोनाबाधित आढळले तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 23 हजार 397 एवढी झाली आहे. त्यापैकी 96 हजार 586 बरे झाले आहेत. सध्या मुंबईत 19 हजार 718 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत आजवर 6 हजार 796 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 004 एवढी झाली आहे. त्यापैकी  बरे झालेले रुग्णांची संख्या 69 हजार 930 एवढी आहे तर सध्या 40 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आजवर 2 हजार 728 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 लाख 25 हजार 090 नमुन्यांपैकी 5 लाख 15 हजार 332 नमुने पॉझिटिव्ह (18.91 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 588 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 857 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.