Maharashtra Corona Update : मागील मृतांसह आज 1409 मृतांची नोंद, कोरोना बळींच्या आकड्याची 5,537 वर झेप

Maharashtra Corona Update: 1409 deaths recorded today with previous deaths, Corona death toll jumps to 5,537 राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या 81 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूंशिवाय मागील 1328 मृत्यूची आज नोंद करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 2701 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 13 हजार 445 इतका झाला आहे. पैकी सध्या 50 हजार 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 81 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. याशिवाय आज मुंबईतील 862 आणि उर्वरीत राज्यातील 466 अशा एकूण 1328 जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे, असे आरोग्य खात्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या मागील कोरोनाबाधित मृतांची जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर 1, अकोला 14, अमरावती 6, औरंगाबाद 33, बुलढाणा 2, धुळे 12, जळगाव 34, जालना 4, लातूर 3, नांदेड 2, नाशिक 28, उस्मानाबाद 3, पालघर 11, परभणी 1, पुणे 85, रायगड 11, रत्नागिरी 1, सांगली 4, सातारा 6, सिंधुदुर्ग 3, सोलापूर 51, ठाणे 146, वाशिम 1, यवतमाळ 1 अशी एकूण 466. राज्याचा मृत्यूदर 4.8 झाला आहे.

आज 1409 कोरोना मृत्यूंची नोंद झाल्यामुळे राज्यातील कोरोना बळींच्या आकड्याने एकदम 5,537 वर झेप घेतली आहे. 1,328 जुन्या मृतांची नोंद का राहिली होती, याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण आरोग्य खात्याने दिलेले नाही.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढविला आहे. राज्य सरकार कोरोनाबाधित मृतांची आकडेवारी लपवत असल्याच्या आरोपाला या प्रकारामुळे पुष्टी मिळालेली आहे. राज्य शासनाने या मृत्यूंची आधी नोंद का केली नव्हती, याचे समर्पक उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सध्या राज्यात 5 लाख 86 हजार 686 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 27 हजार 242 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1,13,445

मृत्यू – 5537

मुंबई महानगरपालिका- 60, 228 (मृत्यू 3167)

ठाणे-2002 (मृत्यू 41)

ठाणे महानगरपालिका- 6330 (मृत्यू 213)

नवी मुंबई मनपा- 4892 (मृत्यू 151)

कल्याण डोंबिवली- 2913(मृत्यू 77)

उल्हासनगर मनपा – 815 (मृत्यू 37)

भिवंडी, निजामपूर – 689 (मृत्यू 24)

मिरा-भाईंदर- 1687 (मृत्यू 98)

पालघर- 455 (मृत्यू 16 )

वसई- विरार- 2138 (मृत्यू 66)

रायगड- 924 (मृत्यू 34)

पनवेल- 1048 (मृत्यू 52)

नाशिक – 365 (मृत्यू 20)

नाशिक मनपा- 829 (मृत्यू 37)

मालेगाव मनपा – 907 (मृत्यू 76)

अहमदनगर- 187(मृत्यू 11)

अहमदनगर मनपा – 61 (मृत्यू 1)

धुळे – 194 (मृत्यू 26)

धुळे मनपा – 254 (मृत्यू 25)

जळगाव- 1476 (मृत्यू 142)

जळगाव मनपा- 405 (मृत्यू 26)

नंदुरबार – 72(मृत्यू 4)

पुणे- 917 (मृत्यू 30)

पुणे मनपा- 10,876 (मृत्यू 527)

पिंपरी-चिंचवड मनपा- 1035 (मृत्यू 31)

सातारा- 760 (मृत्यू 34)

सोलापूर- 154 (मृत्यू 53)

सोलापूर मनपा- 1801(मृत्यू 131)

कोल्हापूर- 633 (मृत्यू 8)

कोल्हापूर मनपा- 100

सांगली- 241 (मृत्यू 10)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 14 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 153(मृत्यू 3)

रत्नागिरी- 445 (मृत्यू 18)

औरंगाबाद – 208 (मृत्यू 32)

औरंगाबाद मनपा – 2649 (मृत्यू 136)

जालना- 295 (मृत्यू 12)

हिंगोली- 242(मृत्यू 1)

परभणी- 55(मृत्यू 4)

परभणी मनपा-27

लातूर -138 (मृत्यू 8)

लातूर मनपा- 50(मृत्यू 3)

उस्मानाबाद-151(मृत्यू 8)

बीड – 77(मृत्यू 2)

नांदेड – 43 (मृत्यू 2)

नांदेड मनपा – 198 (मृत्यू 10)

अकोला – 99 (मृत्यू 16)

अकोला मनपा- 951 (मृत्यू 40)

अमरावती- 32 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 333(मृत्यू 25)

यवतमाळ- 190 (मृत्यू 4)

बुलढाणा – 138 (मृत्यू 5)

वाशिम – 53 (मृत्यू 3)

नागपूर- 99

नागपूर मनपा – 1011 (मृत्यू 12)

वर्धा – 14 (मृत्यू 1)

भंडारा – 51

चंद्रपूर -31

चंद्रपूर मनपा – 20

गोंदिया – 85

गडचिरोली- 49 (मृत्यू 1)

इतर राज्ये/ देश- 93 (मृत्यू 20)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.