Maharashtra Corona Update : राज्यात आज14,161 नवे रुग्ण; 24 तासात 339 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनामुळे 21 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 14 हजार 161 नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील 24 तासात 339 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनामुळे 21 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मागील 24 तासात 11 हजार 749 रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत.

राज्यात करोनाबधितांची संख्या 6 लाख 57 हजार 450 एवढी झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत महाराष्ट्रात 4 लाख 70 हजार 873 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 1 लाख 64 हजार 562 सक्रिय रुग्ण आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 34 लाख 92 हजार 966 नमुन्यांपैकी 6 लाख 57 हजार 450 नमुने पॉझिटिव्ह (18.85 टक्के) आले आहेत. राज्यात 11 लाख 92 हजार 685 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या 35 हजार 132 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 339 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.30 टक्के एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.39 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.