Maharashtra Corona Update : राज्यात आज 15,591 नवे रुग्ण 424 मृत्यू 

एमपीसी न्यूज – राज्यात आज 15,591 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर 424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नवीन 13,294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 14 लाख 16 हजार 513 एवढी झाली असून त्यापैकी एकूण 11 लाख 17 हजार 720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 60 हजार 876 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 78.91% झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आज दिवसभरात 424 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजवर 37 हजार 480 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्यात कोरोना मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 69 लाख 60 हजार 203 नमुन्यांपैकी 14 लाख 16 हजार 513 नमुने पॉझिटिव्ह (20.35 टक्के) आले आहेत. राज्यात 21 लाख 94 हजार 347 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 29 हजार 51 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले पाच जिल्हे

  1. पुणे – सक्रिय रुग्ण 57,682
  2. ठाणे – सक्रिय रुग्ण 30,531
  3. मुंबई – सक्रिय रुग्ण 28,602
  4. नाशिक – सक्रिय रुग्ण 15,336
  5. नागपूर – सक्रिय रुग्ण 13,383

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.