Maharashtra Corona Update: 18 हजार रुग्ण कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण संख्या 37 हजार तर मृतांचा आकडा 1897 वर!

Maharashtra Corona Update: 18 thousand patients are corona free, 57 thousand active patients and 1897 deaths!

एमपीसी न्यूज – राज्यात काल (बुधवार) कोरोनाच्या 2190 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 964 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत 17 हजार 918 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 56 हजार 948 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 03 हजार 976 नमुन्यांपैकी 56 हजार 948 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 37 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 105 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1897 झाली आहे. काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 32, ठाण्यात 16, जळगावमध्ये 10, पुण्यात 9, नवी मुंबई मध्ये 7, रायगडमध्ये 7,  अकोल्यात 6, औरंगाबादमध्ये 4, नाशिक 3,  सोलापूरात 3, सातारा -2, अहमदनगर 1, नागपूर 1, नंदूरबार 1, पनवेल 1 तर वसई विरारमध्ये 1 मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 39 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 21 एप्रिल ते 24 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 66 मृत्यूंपैकी मुंबईचे 21, ठाण्याचे 15, जळगावचे 10, नवी मुंबईचे 7, रायगडचे 7, अकोल्याचे 2, साता-याचे 2,अहमदनगरचा 1, नंदूरबारचा 1 मृत्यू आहे.

काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 72 पुरुष तर 33 महिला आहेत. काल नोंद झालेल्या 105 मृत्यूंपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 50 रुग्ण आहेत तर 45 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 10 जण 40 वर्षांखालील आहे. या 105 रुग्णांपैकी 66 जणांमध्ये ( 63 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय सक्रिय रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- 34,018, बरे झालेले रुग्ण- 8,408, मृत्यू- 1097, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-6, ॲक्टिव्ह रुग्ण- 24,507

ठाणे: बाधित रुग्ण- 7,781, बरे झालेले रुग्ण- 2,224, मृत्यू- 149, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 5,408

पालघर: बाधित रुग्ण- 771, बरे झालेले रुग्ण- 271, मृत्यू- 19, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 , ॲक्टीव्ह रुग्ण- 481

रायगड: बाधित रुग्ण- 896, बरे झालेले रुग्ण- 488, मृत्यू- 25, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टीव्ह रुग्ण- 382

नाशिक: बाधित रुग्ण- 1012, बरे झालेले रुग्ण- 750, मृत्यू- 52, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 210

अहमदनगर: बाधित रुग्ण- 87, बरे झालेले रुग्ण- 47, मृत्यू- 6, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 34

धुळे: बाधित रुग्ण- 129, बरे झालेले रुग्ण- 63, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टीव्ह रुग्ण- 57

जळगाव: बाधित रुग्ण- 505, बरे झालेले रुग्ण- 218, मृत्यू- 51, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 236

नंदूरबार: बाधित रुग्ण- 43, बरे झालेले रुग्ण- 20, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 9

पुणे: बाधित रुग्ण- 6614, बरे झालेले रुग्ण- 3086, मृत्यू- 291, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 3237

सोलापूर: बाधित रुग्ण- 679, बरे झालेले रुग्ण- 287, मृत्यू- 52, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 340

सातारा:  बाधित रुग्ण- 395, बरे झालेले रुग्ण- 128, मृत्यू- 7, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टीव्ह रुग्ण- 260

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 346, बरे झालेले रुग्ण- 18, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 327

सांगली: बाधित रुग्ण- 94, बरे झालेले रुग्ण- 46, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 47

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 19, बरे झालेले रुग्ण- 7, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 12

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- 192, बरे झालेले रुग्ण- 69, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 118

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 1335, बरे झालेले रुग्ण- 793, मृत्यू- 57, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 485

जालना: बाधित रुग्ण- 79, बरे झालेले रुग्ण- 23, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टीव्ह रुग्ण- 56

हिंगोली: बाधित रुग्ण- 133, बरे झालेले रुग्ण- 92, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 41

परभणी: बाधित रुग्ण- 25, बरे झालेले रुग्ण- 1, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 23

लातूर: बाधित रुग्ण- 94, बरे झालेले रुग्ण- 42, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 49

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 45, बरे झालेले रुग्ण- 9, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 36

बीड: बाधित रुग्ण- 40, बरे झालेले रुग्ण- 3, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टीव्ह रुग्ण- 37

नांदेड: बाधित रुग्ण- 105, बरे झालेले रुग्ण- 69, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 31

अकोला: बाधित रुग्ण- 487, बरे झालेले रुग्ण- 200, मृत्यू- 23, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टीव्ह रुग्ण- 263

अमरावती: बाधित रुग्ण- 194, बरे झालेले रुग्ण- 90, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 90

यवतमाळ: बाधित रुग्ण- 115, बरे झालेले रुग्ण- 92, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 23

बुलढाणा: बाधित रुग्ण- 53, बरे झालेले रुग्ण- 28, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 22

वाशिम: बाधित रुग्ण- 8, बरे झालेले रुग्ण- 5, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 3

नागपूर: बाधित रुग्ण- 484, बरे झालेले रुग्ण- 334, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 141

वर्धा: बाधित रुग्ण- 10, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 0

भंडारा: बाधित रुग्ण- 19, बरे झालेले रुग्ण- 1, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 18

गोंदिया: बाधितरुग्ण- 48, बरे झालेले रुग्ण- 1, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 47

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- 25, बरे झालेले रुग्ण- 5, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टीव्ह रुग्ण- 20

गडचिरोली: बाधित रुग्ण- 26, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 26

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 53, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टीव्ह रुग्ण- 40

एकूण: बाधित रुग्ण-56,998, बरे झालेले रुग्ण- 17,918,  मृत्यू- 1897, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 8, ॲक्टीव्ह रुग्ण- 37,125

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.5 दिवस होता तो आज 14.7 दिवस झाला आहे.

● देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या (32,42,160) सुमारे 12.4 टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असून दर दहा लक्ष लोकसंख्येमागे राज्यात 3142 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर 2363 एवढे आहे. 

● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 31.5 % एवढे आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 2684 झोन क्रियाशील असून आज एकूण 17 हजार 119 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 68.06 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे, असे आरोग्य खात्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.