Maharashtra Corona Update : राज्यात 19,164 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 459 कोरोनाबाधितांचा मृत्यू

गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 184  रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

एमपीसीन्यूज : राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 164 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या 12 लाख 82 हजार 963 इतकी झाली आहे. तर  24 तासांमध्ये 459 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात 34 हजार 345  रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 17 हजार 184  रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात 9 लाख 73  हजार 214 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 74 हजार 993 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात मागील 24  तासांमध्ये 14 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 75.76 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 61 लाख 90 हजार 389 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 12 लाख ८२ हजार 963 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात18 लाख 83  हजार 912 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 33 हजार 412 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मागील 24  तासांमध्ये नोंद झालेल्या 459  मृत्यूंपैकी 256  मृत्यू हे मागील48  तासांमधले आहेत. तर 125 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 78  मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पूर्वीचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Maharashtra reports 19,164 new #COVID19 cases, 17,184 recovered cases & 459 deaths in the last 24 hours, taking total positive cases to 12,82,963 till date, including 2,74,993 active cases, 9,73,214 discharges & 34,345 deaths: State Health Department, Govt of Maharashtra pic.twitter.com/eXaBAP0z27

— ANI (@ANI) September 24, 2020

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.