Maharashtra Corona Update : राज्यात आज 19,212 जणांना डिस्चार्ज; 14,976 नव्या रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात आज 19 हजार 212 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्याने 14 हजार 976 कोरोना बाधितांची वाढ झाली, तर 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13 लाख 66 हजार 129 एवढी झाली आहे. त्यापैकी 10 लाख 69 हजार 159 उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात सध्या 2 लाख 60 हजार 363 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्य आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यात आज 430 रुग्ण दगावले आहेत. आत्तापर्यंत 36 हजार 181 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी 78.26 टक्के एवढा असून 2.64 टक्के एवढा मुत्यूदर आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून नव्या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 69 लाख 98 हजार 24 नमुन्यांपैकी 13 लाख 66 हजार 129 नमुने पॉझिटिव्ह (20.40 टक्के) आले आहेत. राज्यात 21 लाख 35 हजार 496 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 29 हजार 947 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

येत्या नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार यावर्षी गरबा व दांडियावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. दसऱ्याला रावणदहनाचा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपाचा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.