Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाच्या 20,206 रुग्णांना डिस्चार्ज ; 392 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 20 हजार 206 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात 18 हजार 390 नवीन रुग्णांचे निदान झाले, तर 392 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 12 लाख 42 हजार 770 एवढी झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 9 लाख 36 हजार 554 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.36 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात सध्या एकूण 2 लाख 02 हजार 410 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 392 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आजवर तब्बल 33 हजार 407 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.69 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सांगली व नागपूर मध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 60 लाख 17 हजार 287 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 12 लाख 42 हजार 770 (20.65) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 लाख 70 हजार 200 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 34 हजार 982 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.