Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,171 नवे रुग्ण, 2,556 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 2,171 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, 2,556 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 43 हजार 393 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 15 हजार 524 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 19 लाख 20 हजार 006 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात आज दिवसभरात 32 रुग्ण दगावले असून आतापर्यंत 50 हजार 894 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.52 टक्के एवढा आहे तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26 टक्के झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.