Maharashtra Corona Update : राज्यात आज 23,365 नवे रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 11 लाखांच्या पुढे

0

एमपीसी न्यूज – राज्यात आज, बुधवारी दिवसभरात 23,365 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 11 लाखांच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात 474 रुग्णांनी आपला जीव गमावला, तर 17,559 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 11 लाख 21 हजार 221 एवढी झाली आहे.

सध्या 2 लाख 97 हजार 125 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर 7 लाख 92 हजार 832 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 474 रुग्णांनी आपला जीव गमावला आजवर राज्यात 30,833 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 17,559 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 70.71 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 2.75 टक्के एवढा आहे.

आजवर करण्यात आलेल्या 55 लाख 06 हजार 276 चाचण्या पैकी 11 लाख 21 हजार 221 चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. राज्यात सध्या 17 लाख 53 हजार 347 लोक होम क्वारंटाइन आहेत तर, 36 हजार 462 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.