Maharashtra Corona Update: मागील 24 तासांत नवे 2,608 रुग्ण, 821 जणांना डिस्चार्ज तर 60 जणांचा मृत्यू

Maharashtra Corona Update: 2,608 new patients, 821 discharged and 60 died in last 24 hours

0

एमपीसी न्यूज : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 47 हजार 190 झाली आहे. आज (शनिवारी) 2 हजार 608 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात कोरोनामुक्त झालेल्या 821 जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 13 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 32 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. दोन हजारपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचा सलग सातवा दिवस आहे

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 48 हजार 26 नमुन्यांपैकी 2 लाख 98 हजार 696 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 47 हजार 190 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 85 हजार 623 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 33 हजार 545 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 60 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1,577 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 40, पुण्यात 14, सोलापूरात 2, वसई विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाणे 1 तर नांदेड शहरात 1 मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 24 तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 41 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 60 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 29 रुग्ण आहेत तर 24 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 60 रुग्णांपैकी 36 जणांमध्ये (60 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 28,817 (949)

ठाणे मंडळ एकूण: 36,173 (1,069)

नाशिक मंडळ एकूण: 1,535 (103)

पुणे मंडळ एकूण: 6,118 (297)

कोल्हापूर मंडळ एकूण: 455 (5)

औरंगाबाद मंडळ एकूण: 1,407 (43)

लातूर मंडळ एकूण: 220 (7)

अकोला मंडळ एकूण: 689 (34)

नागपूर मंडळ एकूण:  545 (8)

इतर राज्ये: 48 (11)

एकूण:  47 हजार 190 (1,577)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2,345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 414 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 65.91 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like