Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,752 नवे कोरोना रुग्ण, 45 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 2 हजार 752 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 09 हजार 106 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 12 हजार 264 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 44 हजार 831 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज दिवसभरात 1 हजार 743 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 785 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 45 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.53 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.