Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,768 नवे रुग्ण; 25 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 2 हजार 768 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 25 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 34 हजार 934 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 41 हजार 398 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 53 हजार 926 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात 1 हजार 739 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.72 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 25 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 280 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.51 टक्के एवढा आहे.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 49 लाख 28 हजार 130 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 20 लाख 41 हजार 398 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 77 हजार 560 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 025 ज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.