Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,771 नवे रुग्ण ; 2,613 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 2,771 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर 2,613 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 43 हजार 147 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 15 हजार 524 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 19 लाख 25 हजार 800 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26 टक्के झाले आहे. राज्यात सध्या पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर व नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोविड-19 रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.