Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,854 नवे रुग्ण, 60 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 2 हजार 854 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 16 हजार 236 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 1 हजार 526 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आत्तापर्यंत 18 लाख 07 हजार 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 58 हजार 091 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 94.34 टक्के एवढा आहे तर, मृत्यूदर 2.57 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 24 लाख 51 हजार 919 नमून्यांपैकी 19 लाख 16 हजार 236 नमूने सकारात्मक आले आहेत.

राज्यात सध्या 4 लाख 64 हजार 121 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 704 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केले. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व इतर आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.