Maharashtra Corona Update : राज्यात आज 28,699; तर पुणे जिल्ह्यात 5,722 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज कोरोना रुग्णांची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात 28 हजार 699 तर,पुणे जिल्ह्यात  5 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 लाख 33 हजार 026 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 22 लाख 47 हजार 495 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज दिवसभरात 13 हजार 165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73 टक्के एवढं झाले आहे.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 2 लाख 30 हजार 641 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना मृतांची संख्या 53 हजार 589 एवढी झाली असून, आज दिवसभरात 132 जणांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात सध्या 11 लाख 77 हजार 265 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 11 हजार 887 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यातील प्रमुख शहरांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या नागरिक आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.