Maharashtra Corona Update : आज 3007 कोरोना रुग्णांची नोंद, तर 1924 जण कोरोनामुक्त, मृतांच्या आकड्याने ओलांडला तीन हजारांचा टप्पा

Maharashtra Corona Update: 3007 corona patients registered today, 1924 corona-free, death toll crosses 3,000 mark राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 85,975 एवढी झाली आहे. पैकी 39,314 जणांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे तर, 43,591 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3,007 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 85,975 एवढी झाली आहे. त्यापैकी 39,314 जणांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे तर 43,591 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 91 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली असून आजवर 3060 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 आज नोंद झालेल्या 91 मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 71 (मुंबई 61, उल्हासनगर 5, मीरा-भाईंदर 4, पालघर 1), नाशिक- 1 (नाशिक 1), पुणे- 14 (पुणे 6, सोलापूर 8), कोल्हापूर- 2 (कोल्हापूर 2), औरंगाबाद-1 (जालना 1), अकोला-1 (अकोला मनपा 1). इतर राज्य- 1 (पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)

राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेले सहा जिल्हे व एकूण रुग्ण संख्या कंसात सक्रिय रुग्ण संख्या.
ठाणे – 13014 (7846)
पुणे – 9705 (3783)
औरंगाबाद – 1965 (684)
नाशिक – 1521 (405)
पालघर – 1485 (838)
रायगड – 1441 (649)

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 51 हजार 64 नमुन्यांपैकी 85 हजार 975 नमुने पॉझिटिव्ह (15.58 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 5 हजार 463 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 77 हजार 654 खाटा उपलब्ध असून सध्या 28 हजार 504 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात अडकून पडलेल्या मजुरांचे स्थलांतर सुरू झाल्यापासून तसेच अनलाॅक 1.0 सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. देशातील दररोज 10 हजारांच्या घरात होणारी रुग्णांची वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ करणारी आहे.

दरम्यान, सोमवार पासून देशात अनलाॅक 1.0 च्या माध्यमातून मंदिर, रेस्टॉरंट यांना सशर्त उघडण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी या विषाणू पासून बचाव करण्यासाठी स्वत:च जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.