Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,039 जणांना डिस्चार्ज, 2910 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 3 हजार 39 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 2 हजार 910 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 87 हजार 678 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 18 लाख 84 हजार 127 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 51 हजार 965 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 388 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 52 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के एवढं झाले आहे.

आजवर राज्यात 1 कोटी 37 लाख 43 हजार 486 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 87 हजार 678 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 705 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 37 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला आज भारतात सुरुवात झाली. दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील सफाई कर्मचारी मनिष कुमार यांना देशात सर्वात पहिली लस टोचण्यात आली. देशात आज दिवसभरात 1.65 लाख लोकांना कोरोना लस टोचण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like