Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,081 नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 3 हजार 081 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर, 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 लाख 90 हजार 759 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 18 लाख 86 हजार 469 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 52 हजार 653 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 138 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के एवढं झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.