Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,187 नवे कोरोना रुग्ण, 49 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) 3 हजार 187 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 3 हजार 253 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 47 हजार 793 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 68 हजार 530 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.26 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात सध्या 36 हजार 675 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 49 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 39 हजार 011 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत 5 कोटी 88 लाख 84 हजार 819 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 52 हजार 309 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.