Maharashtra Corona Update : राज्यात 3,277 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 17.23 लाखांवर

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – राज्यात सोमवारी (दि.9) दिवसभरात 3 हजार 277 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 23 हजार 135 झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 94 लाख 82 हजार 940 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 23 हजार 138 (18.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 38 हजार 500 जण गृह विलगीकरणात आहेत. तर 7 हजार 586 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्याचा मृत्यू दर 2.63 टक्के एवढा आहे.

थंडी वाढत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सर्तक राहण्याचं आवाहन केलं. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.