Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,282 नवे रुग्ण, 35 रुग्णांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 3 हजार 282 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 42 हजार 136 एवढी झाली आहे. 

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 2 हजार 064 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 18 लाख 36 हजार 999 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.64 टक्के एवढं आहे. राज्यात आजघडीला 54 हजार 317 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर राज्यात 49 हजार 666 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या 2.55 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 29 लाख 58 हजार 502 नमून्यांपैकी 19 लाख 42 हजार 136 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 972 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 969 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.