Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,431 नवे रुग्ण, 1,427 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 3 हजार 431 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 1 हजार 427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 लाख 13 हजार 382 एवढी झाली आहे. त्यापैकी 18 लाख 06 हजार 298 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या 56 हजार 823 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 94.40 टक्के एवढा आहे तर, मृत्यूदर 2.56 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 24 लाख 01 हजार 637 नमून्यांपैकी 19 लाख 13 हजार 382 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 4 लाख 77 हजार 528 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 695 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.