Maharashtra Corona Update : राज्यात आज 351 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद, 35 मृत्यू 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) दिवसभरात 2,831 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 351 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहेत. राज्यात आज 35 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 47 हजार 746 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 69 हजार 772 जण बरे झाले आहेत. 8,695 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.73 टक्के एवढा झाला आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 30 हजार 547 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 35 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 451 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजवर 7 कोटी 66 लाख 39 हजार 114 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 1,544 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 3,14,531 जण होम क्वारंटाईन आहेत.
ओमायक्रॉन अपडेट 
महाराष्ट्रात आज दिवसभरात 351 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 148 औरंगाबाद आणि 111 नाशिक मधील आहेत. आजवर राज्यात 4,345 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली त्यापैकी 3,334 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.