Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,556 नवे रुग्ण; 3,009 जणांना डिस्चार्ज

0

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3 हजार 55 नव्या कोरोना रुग्णांची वाढ राज्यात झाली असून, 3 हजार 9 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 18 लाख 74 हजार 279 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 78 हजार 044 एवढी झाली आहे. त्यापैकी आज घडीला राज्यात 52 हजार 365 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 221 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 70 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.75 टक्के एवढं झाले आहे.

कोरोना लस महाराष्ट्रात आली असून 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. याबद्दल माहिती देताना राजेश टोपेंनी सांगितलं की, मला समाधान आहे. आपण आठ लाख लोकांना अपलोड केलं आहे. त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे.

जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल.

16 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रात दोन ठिकाणी पंतप्रधानांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामधील एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय आहे. येथून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.