Maharashtra Corona Update : आज 3,558 नवे कोरोना रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – आज दिवसभरात राज्यात 3 हजार 558 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 लाख 69 हजार 114 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात 2 हजार 302 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आजवर 18 लाख 63 हजार 702 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 54 हजार 179 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 61 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 34 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्के एवढं झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 34 लाख 01 हजार 170 नमून्यांपैकी 19 लाख 69 हजार 114 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 34 हजार 845 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 453 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.