Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,670 नवे रूग्ण; 2,422 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 3 हजार 670 कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली असून, 2 हजार 422 बरे झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्याच्या घडीला राज्यात 31 हजार 474 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज झालेल्या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 55 हजार 933 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 72 हजार 475 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.91 टक्के एवढा झाला आहे.

लसीकरणानंतरही राज्यात रुग्ण संख्या वाढत असली तरी लाॅकडाऊनचा विचार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लसीकरणानंतरही राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मात्र, याबाबत कोरोनाच्या नियमांचं पालन करणं हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, राज्यात कुठेच पुन्हा लाॅकडाऊन लावण्याचा विचार नाही किंवा त्याचा संबंध पण नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर पाहिजे आणि त्यानंतर पंधरा दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही टोपे यांनी म्हंटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.