Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,693 नवे रुग्ण; 73 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 3 हजार 693 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली, तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 61 हजार 975 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 2 हजार 890 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यात आतापर्यंत 18 लाख 58 हजार 999 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 51 हजार 838 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात राज्यात 73 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 49 हजार 970 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.55 टक्के एवढा आहे तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 32 लाख 67 हजार 917 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 19 लाख 61 हजार 975 नमुने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 42 हजार 585 जण होम क्वारंटाईन आहेत, तर 3 हजार 15 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.