Maharashtra Corona Update : आज 33,914 नवे कोरोना रुग्ण, 30,500 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) 33,914 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 30,500 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 लाख 69 हजार 425 एवढी झाली आहे. त्यापैकी 71 लाख 20 हजार 436 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 94.06 टक्के एवढा आहे.

 

सध्याच्या घडीला राज्यात 3 लाख 02 हजार 923 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 86 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 42 हजार 237 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 36 लाख 84 हजार 359 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.