Maharashtra Corona Update : राज्यात 4 हजार 174 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – आज राज्यात 4 हजार 174 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांचा आकडा 4 हजारांच्या आसपास असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासांत 4 हजार 155 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

  राज्यात आतापर्यंत एकूण 63 लाख 8 हजार 491 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.09 टक्के इतकं आहे. राज्यात सध्या 47 हजार 880 रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात आज 65 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

  

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 53 लाख 38 हजार 772 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 97 हजार 872 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 07 हजार 913 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 937 व्यक्ती सांस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.