Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,130 नवे कोरोना रुग्ण, 2,506 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शनिवारी) दिवसभरात 4 हजार 130 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 2 हजार 506 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज घडीला 52 हजार 025 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 82 हजार 117 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 88 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.02 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आज 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 37 हजार 707 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 46 लाख 60 हजार 825 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 02 हजार 196 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 013 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.