Maharashtra Corona Update : आज 4,196 जणांना डिस्चार्ज, राज्यात 16.85 लाख कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्याने वाढ झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 4 हजार 196 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 हजार 837 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 18 लाखांच्या पुढे गेली असून त्यापैकी 16.85 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 23 हजार 896 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 90 हजार 557 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 80 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 47 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून तो 92.39 टक्के एवढे आहे. मात्र, राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्क्यांवर कायम आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणणे हे खरं आरोग्य विभागासमोर आव्हान आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 56 हजार 384 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 18 लाख 23 हजार 896 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 35 हजार 530 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 354 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर व नागपूर या जिल्ह्यात सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.